भारतीय संघाला मोठा धक्का, केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

WhatsApp Group

IND vs SA: केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार केएल राहुलशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल कंबरेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे, तर कुलदीप यादव नेटमध्ये फलंदाजी करत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली त्यामुळे तोही संघातून बाहेर पडला आहे. केएल राहुल आणि कुलदीप यादव संघातून बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय केएल राहुलची आणखी एक मोठी अनुपस्थिती असेल.

भारताचा संघ – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुमार भुवन, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.