KKR vs PBKS: हाय-व्होल्टेज सामन्यात पंजाबने कोलकाताचा केला पराभव, बेअरेस्टो-शशांकची आक्रमक खेळी

0
WhatsApp Group

KKR vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)चा 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती आणि असेच काहीसे या सामन्यात पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 261 धावांची मोठी मजल मारली. 262 लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाने सहज केला. पंजाबने 262 धावांचे लक्ष्य अवघ्या 18.4 षटकांत पूर्ण केले. हा सामना पंजाब संघाने 8 गडी राखत खिशात घातला.

पंजाब संघाने 18.4 षटकांत 2 गडी गमावून 262 धावा केल्या. पंजाब किंग्जच्या चारही फलंदाजांनी अप्रतिम खेळी खेळली. जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावा आणि शशांक सिंगने 28 चेंडूत 68 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 20 चेंडूत 54 धावा केल्या. रिले रुसोने 16 चेंडूत 26 धावांची खेळी खेळली.

जॉनी बेअरस्टोची आक्रमक खेळी 

या सामन्यात जॉनी बेअरस्टोने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. त्याने आक्रमक फलंदाजी करत मोठे फटके मारले. केकेआरचा कोणताही गोलंदाज त्याच्यासमोर चांगली गोलंदाजी करू शकला नाही. बेअरस्टोने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले.

लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभासिमरननेही आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल इतिहासात पंजाबसाठी अर्धशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. या संघात फक्त केएल राहुलने (14चेंडू) त्याच्यापेक्षा वेगवान अर्धशतक ठोकले आहे.