KKR vs MI: कोलकात्याने 18 धावांनी जिंकला सामना; मुंबईची खराब फलंदाजी

0
WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७व्या हंगामातील ६० वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. पावसामुळे हा सामना १६-१६ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १५७ धावा केल्या होत्या.

कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने ४२ धावांची तर नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि पियुष चावला यांनी २-२ बळी घेतले आहेत. मुंबई इंडियन्स संघ २० षटकात केवळ १३९ धावा करू शकला.