KKR vs MI IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा पहिला हंगाम खूपच खराब गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुबई संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह हार्दिक पांड्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची भर पडली आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स संघासोबत असे काही घडले आहे जे आयपीएलच्या इतिहासात त्यांच्या संघासोबत यापूर्वी कधीही घडले नव्हते.
या मोसमात कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांमधे हार्दिक पांड्याच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्स स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवर एकाच मोसमात पराभवाचा सामना करावा लागला. याआधी कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला इतक्या वाईट परीस्थितीचा सामना करावा लागला नव्हता.
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं
मुंबई इंडियन्सच्या संघाने या मोसमात आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत.या कालावधीत मुंबई इंडियन्सने ९ सामने गमावले असून फक्त ४ सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने एका मोसमात ९ किंवा त्याहून अधिक सामने गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १० सामने गमावले होते.
आयपीएलच्या एका मोसमात मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक पराभव
- १० पराभव – २०२२
- ९ पराभव – २०२४
- ८ पराभव – २००९
- ८ पराभव – २०१४
- ८ पराभव – २०१८
- १० पराभव – २०२२