13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं तिच्यावर मी बोलणार नाही; किशोरी पेडणेकर

WhatsApp Group

मुंबई : शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे.

राणांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ही उत्तर दिलं आहे. शिवाय शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या आहेत.

गद्दार आमदारांनी बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावावं : भास्कर जाधव

एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना एकदम कट्टर शिवसैनिक होते. मात्र आत्ता ते फक्त म्हणायला शिवसैनिक राहिले आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही  निशाणा साधला आहे.