चला दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया, किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ

WhatsApp Group

मुंबई – महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर भाजप कडून सातत्याने आरोप करण्यात येतं आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं. किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट बाबत तक्रार केली होती. दरम्यान आता आता किरीट सोमय्या यांनी थेट हे रिसॉर्ट पाडण्याबाबत ट्विट केले आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी लिहिले आहे कि, “26 मार्च – चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता सोमय्या यांनी तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केले आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भाजपकडून आरोप करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी केलेल्या या ट्विटमुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.