वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे Kieron Pollard announces retirement. किरॉन पोलार्ड 15 वर्षे वेस्ट इंडिजकडून खेळला. पोलार्ड सध्या भारतात असून तो इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. पोलार्डने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
Kieron Pollard retires from international cricket ✨
Read more: https://t.co/5RwjekcMBy pic.twitter.com/UxPJ0098AV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 20, 2022
किरॉन पोलार्डने 123 एकदिवसीय सामने खेळले, 2706 धावा केल्या आणि 55 बळी घेतले. तो जगातील सर्वोत्तम T20I फलंदाजांपैकी एक आहे. पोलार्डने 101 T20I सामन्यात 135.14 च्या स्ट्राईक रेटने 1161 धावा केल्या आहेत. पोलार्ड फेब्रुवारी 2022 मध्ये भारविरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका खेळली होती. या मालिकेत त्याने वेस्ट इंडिज ODI आणि T20I संघाचे नेतृत्व केले होते.