
किडनी फेल होण्याचे चेहऱ्यावर दिसणारे सुरुवातीचे 6 संकेत
- डोळ्यांच्या आजूबाजूला सूज: सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या खाली किंवा आसपास सूज असेल, तर ती केवळ झोपेची कमतरता किंवा अॅलर्जी नसून किडनीतील समस्या असू शकते. किडनीच्या कार्यात अडथळा आल्यास शरीरात पाणी साचते, ज्यामुळे हा भाग सुजतो.
- चेहरा पिवळसर किंवा फिकट होणे: किडनी नीट काम न केल्यास शरीरात रेड ब्लड सेल्स कमी होतात. त्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. परिणामी चेहरा पिवळसर, फिकट किंवा निस्तेज दिसू लागतो.
- ओठ आणि त्वचा कोरडी पडणे: किडनीच्या आजारात शरीरातील ओलावा कमी होतो. परिणामी ओठ फाटणे, त्वचा कोरडी होणे आणि चेहऱ्याची चमक कमी होणे असे बदल दिसतात.
- चेहऱ्यावर लालसरपणा किंवा चकत्ते: रक्तातील टॉक्सिन्स बाहेर न गेल्यास त्वचेवर लाल चट्टे, खाज किंवा रॅशेस दिसू शकतात. ते किडनी फेल होण्याचे संकेत असू शकतात.
- डोळ्याखालील काळी वर्तुळे: किडनीच्या आजारामुळे थकवा वाढतो, झोप कमी होते आणि त्याचा थेट परिणाम डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसण्यात होतो.
- अचानक चेहरा सुजणे: काही दिवसांत चेहऱ्यावर फुगलेपणा दिसणे किंवा विनाकारण वजन वाढणे हे फ्लुइड रिटेन्शनचे लक्षण असून, किडनी फेल होण्याचा इशारा असू शकतो.