कियाराला स्वतःचा ड्रेसही सांभाळता येईना, बोल्ड लूक झाला कॅमेऱ्यामध्ये कैद

WhatsApp Group

कियारा अडवाणी सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र या सगळ्या अफवांकडे हे दोघंही पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दोघंही आपल्या नात्याबाबत मौन पाळणंच पसंत करतात.

सध्या कियारा तिचं खाजगी आयुष्य अगदी एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स फारच कमालीचा आहे. आपला प्रत्येक लूक अगदी परफेक्ट असावा असं तिला वाटतं. फॅशनच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं तिला पसंत आहे. मात्र यावेळी तिने फॅशनच्याबाबतीत केलेला प्रयोग पूर्णपणे फसला.

कियारा नुकतीच जीक्युच्या(GQ) रेड कार्पेटवर एकदम स्टायलिस्ट अंदाजात दिसली. पण यावेळी तिने रेड कार्पेटसाठी जो ड्रेस निवडला होता तो काही वेगळाच होता. हा ड्रेस तिच्यासाठीच अडचण निर्माण करणारा ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याचदरम्यानचे कियाराचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कियाराने हाय स्लिट कट ड्रेस परिधान केला होता. मात्र हा ड्रेस ती सतत सांभाळताना दिसत होती. इतकंच नव्हे तर फोटोसाठी पोझ देणंही तिच्यासाठी अवघड झाले होते.