26 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या तिरंग्याऐवजी खलिस्तानी झेंडा फडकवला जाईल! सिख फॉर जस्टिसची धमकी

WhatsApp Group

नवी दिल्ली – २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल, अशी धमकी खलिस्तानी आतंकवादी संघटना सिख फॉर जस्टिसने दिली आहे. गुरपतवंत सिंग पन्नूने Gurpatwant Singh Pannun ही घोषणा केली आहे. भारतातील तिरंगा ध्वजाच्या जागी खलिस्तानी ध्वज फडकवण्यासाठी 1 मिलियन डॉलर्सचे बजेट केल्याचा दावा पन्नूने केला आहे.

यासाठी सिख फॉर जस्टिसकडून Sikhs for Justice एक पोस्टर देखील जारी करण्यात आले आहे ज्यात PM मोदींचा फोटो देखील आहे. त्यावर 26 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या तिरंग्याऐवजी खलिस्तानी झेंडा फडकवला, असे लिहिले आहे.


गुरपतवंत सिंग पन्नूने 26 जानेवारीला दिल्लीतील लोकांना घरीच राहण्यासाठी आणि भारताच्या तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकवण्यासाठी 1 मिलियनचे डॉलर्सचे बजेट जाहीर केले आहे. सोशल मीडियावर खलिस्तानी पन्नूचा द्वेष पसरवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सिख फॉर जस्टिस ही संघटना चालवणारे गुरपतवंत सिंग पन्नू विदेशात बसून दररोज व्हिडिओद्वारे धमक्या देत असतो. अनेक एजन्सी पन्नूला मागावार आहेत.