Kevin O ‘Brien Retirement: आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

WhatsApp Group

Kevin O ‘Brien Retirement: आयर्लंड क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केविनने गेल्या वर्षी वनडेतून निवृत्ती जाहीर केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना केविनने सांगितले होते की, त्याचे संपूर्ण लक्ष आता टी-20 आणि कसोटी क्रिकेटवर असेल. मात्र आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केविनच्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत आयर्लंडने बरेच काही साध्य केले. आयर्लंड क्रिकेटमध्ये त्याचे खूप मोठे योगदान आहे.

केविन ओब्रायनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक खेळी खेळल्या. त्याने 2011 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध बंगळुरूमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले होते. त्याने 50 चेंडूत शतक झळकावले. त्याचबरोबर या सामन्यात त्याने 63 चेंडूत 113 धावांचे शानदार शतक झळकावले. केविनच्या या शतकी खेळीमुळे आयर्लंडने इंग्लंडचा तीन गडी राखून पराभव केला होता.

आयर्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. केविनने आयर्लंडकडून 152 एकदिवसीय आणि 109 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2 शतकांच्या मदतीने 3619 धावा केल्या. टी-20 मध्‍ये 1973 धावा केल्या आहेत आणि त्‍याने कसोटीमध्‍ये केवळ 3 मॅच खेळल्‍या त्यात त्याने 258 धावा केल्या. केविन ओब्रायनने आयर्लंडसाठी टी-20 मध्ये शतक झळकावले आहे. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो.