
अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत वाढ झाली आहे. केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून केतकीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अॅक्ट्रोसिटी गुन्ह्यातील जामीन अर्जावर न्यायालय 16 जून रोजी सुनावणी करणार आहे.
केतकीवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली आहे. तर पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायलाने सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आता 16 जूनला सुनावणी होणार आहे.