केरळमध्ये साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेला सर्पमित्र वावा सुरेशला कोब्राने चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे snake catcher Vava Suresh . कोट्टायम येथे सोमवारी किंग कोब्रा पकडण्यासाठी ते गेले होते. यादरम्यान किंग कोब्राने king cobra त्यांचा चावा घेतला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोट्टायम येथे एका बचाव मोहिमेदरम्यान हा सर्व प्रकार घडला. सुरेश यांचा साप पकडतानाचा व्हिडिओ तेथील एका स्थानिक रहिवाश्याने शूट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाचं व्हायरल होतं आहे.
The moment when popular snake handler Vava Suresh got bit by a cobra in Kottayam, Kerala. He’s currently in a critical condition.
Trigger warning. pic.twitter.com/Zp9vLf8uXY
— Vishnu Varma (@VishKVarma) January 31, 2022
वावा सुरेश यांच्यावर Vava Sureshकोट्टायमयेथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्पमित्र वावा सुरेशने आजवर 50 हजारांहून अधिक साप पकडले आहेत.