प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की अभिनेत्री लवकरच दुबईस्थित एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे. पण, नुकतेच कीर्तीनेच याप्रकरणी मौन तोडले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
कीर्ती दुबईस्थित बिझनेसमन फरहान बिन लियाकतसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच दोघेही सेटल होण्याच्या तयारीत आहेत, असे बऱ्याच दिवसांपासून सांगितले जात आहे. आता अशाच एका बातमीवर कीर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. अशी बातमी पाहून सुरुवातीला कीर्तीला हसू आवरता आले नाही. अशा बातम्यांना रिट्विट करत त्यांनी लिहिले, ‘हाहाहा! सध्या तसे काही नाही, माझ्या मित्राचे नाव मधे आणणे योग्य नाही. जेव्हाही मला लग्न करावं लागेल तेव्हा मी खरा गूढ माणूस उघड करेन. तोपर्यंत शांत राहा.
Hahaha!! Didn’t have to pull my dear friend, this time!
I will reveal the actual mystery man whenever I have to 😉
Take a chill pill until then!PS : Not once got it right 😄 https://t.co/wimFf7hrtU
— Keerthy Suresh (@KeerthyOfficial) May 22, 2023
कीर्ती सुरेशने भूतकाळात ‘दसरा’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटातून खूप चर्चा घडवली होती. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती आणि ती नानीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कीर्तीने क्रूला 130 सोन्याची नाणी वाटली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नाण्यांची किंमत सुमारे 70 लाख रुपये होती.
कीर्तीकडे आगामी काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या वर्षी त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील एक चित्रपट म्हणजे ‘ममनन’. याशिवाय कीर्ती मेगास्टार चिरंजीवीच्या ‘भोला शंकर’मध्ये दिसणार आहे. याशिवाय कीर्ती ‘सायरन’, ‘रघु थाथा’ आणि ‘रिव्हॉल्व्हर रिटा’ यांसारख्या तमिळ चित्रपटांचाही भाग आहे.