एलेना रिबाकिनाने जिंकला विम्बल्डन Wimbledon ‘ग्रँड स्लॅम’

WhatsApp Group

कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनाने ट्युनिशियाच्या ओन्स जबेउरचा पराभव करून विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले Elena Rybakina wins the Wimbledon . एलेनाने हा अंतिम सामना जिंकून स्वत:साठी आणि तिच्या देशासाठी ऐतिहासिक पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. रिबाकिनाने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित ओन्स जेबुरचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये एलेना रिबाकिनाने आपली सर्व्हिस लवकर गमावल्याने जेबुरने ३-१ अशी आघाडी घेतली आणि पहिल्या सेटमध्ये ६-३ असा विजय नोंदवला. मात्र नंतरचे 2 सेट रिबाकिनाने जिंकत ‘ग्रँड स्लॅम’ आपल्या नावावर केला.  ग्रँड स्लॅम स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ओन्स जेबुर Ons Jabeur ही अरब जगतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.


विजेतेपद जिंकल्यानंतर 23 वर्षीय एलेना रिबाकिना म्हणाली, ‘मला आनंद आहे की हा कठीण सामनासंपला आहे. कारण खरं तर मला याची कधीच अपेक्षा नव्हती. की मी विम्बल्डन २०२२ चे विजेतेपद जिंकेन. मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलेना रिबाकिना 2018 पासून कझाकस्तान देशाचे प्रतिनिधित्व करत आहे