अत्यंत दुःखदायक बातमी, पंडित बिरजू महाराज यांचे निधन!

WhatsApp Group

नवी दिल्ली – कथ्थक नृत्याचे सम्राट अशी ओळख असलेल्या पंडित बिरजू महाराज ( Birju Maharaj ) यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री उशिरा त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.


पंडित बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून बिरजू महाराज किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. त्यांच्या नातवाने सांगितले की त्यांचा मृत्यू कदाचित हृदयविकाराच्या झटक्याने झाला. आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. ज्यामध्ये बाजीराव मस्तानीसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. पद्मविभूषण व्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील मिळाला आहे. 2012 मध्ये विश्वरूपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बिरजू महाराज यांच्या निधनानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.