शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी योग्य, कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय

WhatsApp Group

कर्नाटक : हिजाब वाद प्रकरणी आज कर्नाटक उच्च न्यायालयाने Karnataka High Court आपला निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हिजाब Hijab घालणे ही इस्लामची सक्तीची धार्मिक प्रथा नाही, असे म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.

जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी केल्याने काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल परिधान करून आले तेव्हा हा वाद निर्माण झाला होता.

उडुपी येथील मुलींच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम काझी यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. या मुलींनी त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग असल्याने त्यांना शाळेच्या गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.