
करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. फॅशनपासून ते डान्स, अॅक्टिंग आणि पर्सनल लाइफपर्यंत करीना सर्वच बाबतीत चर्चेत असते. सोशल मीडियावरही करीना अनेकदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा एक डान्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे.
या नवीन व्हिडिओमध्ये करीना डान्स मंकी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिचा दमदार डान्स पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.
View this post on Instagram
41 वर्षीय करीना कपूर खानने तिच्या व्हिडिओमध्ये भिन्न आणि जोरदार स्टायलिश ब्लॅक वर्कआउट आउटफिट्स घातले आहेत. तिला प्रिंटेड ब्लू आणि ब्लॅक को-ऑर्ड सेट, ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा आणि लेगिंग्स, पेन्सिल स्कर्ट आणि ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लॅक प्रिंटेड स्पोर्टवेअर आणि जॅकेट घातलेले दिसू शकते. व्हिडिओमध्ये डान्ससोबतच करीना योगा करतानाही दिसत आहे.