
Kareena Kapoor On Her Pregnacny : अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचे काही फोटो समोर आले होते, जे तिच्या बेबी बंपसारखे दिसत होते. त्यानंतर सोशल मीडियावर करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आता अभिनेत्रीने यावर मौन सोडले असून, त्याचे सत्य सांगितले आहे.
तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना करिनाने तिसऱ्यांदा आई बनण्याच्या चर्चांबद्दल बोलले आहे. तिने लिहिले- ‘शांत राहा, मी गरोदर नाही. सैफ म्हणतो की त्याने आधीच लोकसंख्येसाठी खूप योगदान दिले आहे.’ पुढे, करिनाने हसण्याचे इमोजी टाकले आहेत.
मात्र, अभिनेत्रीच्या या पोस्टवरून ती आई होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, सध्या सुरू असलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत. मात्र, या बातमीवर करीना ज्या पद्धतीने बोलली ती खूपच मजेदार आहे.