
टीव्हीवरील प्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कपिल शर्माने संगीत क्षेत्रात प्रवेश केला आहे. कपिलने गायक गुरु रंधावासोबत त्याचे पहिले गाणे रिलीज केले आहे. या गाण्याचे शीर्षक अलोन आहे. टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनलवर गुरुवारी, ९ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचा व्हिडिओ कपिल शर्मा, गुरु रंधावा आणि अभिनेत्री योगिता बिहानी यांच्यावर शूट करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल गुरु रंधवाचे असून संगीत संजयने दिले आहे. आपल्या कॉमेडीने लोकांना नेहमी हसवणारा कपिल या गाण्यात खूपच गंभीर अंदाजात दिसत आहे.
‘अलोन’ हे गाणे मनालीच्या डोंगरावर चित्रीत करण्यात आले आहे. कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरही त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. कपिलने हे गाणे खास व्हॅलेंटाइन वीकमध्ये रिलीज केले आहे. 4 मिनिटांच्या या गाण्यातील कपिलचा स्वॅग लोकांना आवडला, पण त्याच्या चेहऱ्यावरील दुःखाने लोकांना अस्वस्थ केले.