“मी त्याच्या कानाखाली मारणार”, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर कपिल देव संतापले

WhatsApp Group

भारतीय संघाचे माजी खेळाडू कपिल देव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कपिल देव अनेकदा खेळाडूंवर कठोर टिप्पणी करण्यासाठी ओळखले जातात. ते अतिशय निर्भीडपणे आणि निर्भयपणे आपला दृष्टिकोन चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या बद्धल केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आले आहेत.

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 31 डिसेंबर रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो टीम इंडियाचा भाग नाही. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडिया पुराचं कॉम्बिनेशन बिघडलं आहे. ज्यावर 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,

“ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली मारणार. त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे कॉम्बिनेशन खराब केले आहे. आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात? म्हणूनच कानाखाली मारावी लागेल. असं कपिल देव म्हणाले आहेत. 

कपिल देव पुढे म्हणाले, ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आयसीसीने त्याची प्लेइंग-11 मध्ये निवड केली. कसोटीतील पंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. वेगवान धावा करून तो दुसऱ्या संघावर दबाव निर्माण करतो. गाबामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही असेच काहीसे केले होते. त्यामुळे त्याची खेळी आजही स्मरणात आहे. पण दुखापतीमुळे तो भारतात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा भाग नाही. मात्र पंतच्या पुनरागमनासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.  तो 5-6 महिन्यांनी पुन्हा मैदानात खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे.