
भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधीवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधीं यांच्या टीशर्टवर निशाणा साधला होता. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो देखील शेअर केला आहे. टीशर्टची किंमत 41,257 रूपये असल्याचा आरोप भाजपाने केला असून यावर टीकास्त्र सोडत ‘भारत देखो’ असा टोला लगावला होता.
दरम्यान आता काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर बोचरी टीका करण्यात आली आहे. “12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास!” असं म्हटलं आहे.
12 करोड़ की गाड़ी, 10 लाख के सूट और डेढ़ लाख के चश्मे वाले फेक फकीर को एक टीशर्ट से दिक्कत हो रही है !
साहब आप जितना मर्जी उलझा लो, मुद्दा आपके और हमारे कपड़ों का नहीं है। बात 140 करोड़ लोगों के रोटी कपड़ा और मकान का है। हम उस पथ पर अडिग रहेंगे। #BharatJodoYatra
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) September 9, 2022
काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार (Congress Kanhaiya Kumar) यांनी भाजपा (BJP) आणि नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. . आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीरला टी-शर्टचा त्रास! साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा गोंधळ करा, मुद्दा तुमचा आणि आमच्या कपड्यांचा नाही. तो 140 कोटी लोकांच्या रोटी, कपडा आणि मकानचा आहे. आम्ही त्या मार्गाला चिकटून राहू. असं ट्वीट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.