Kangana Ranaut : कंगना रनौतचा ‘Emergency’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

WhatsApp Group

Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने आता तिच्या आगामी ‘इमरजेंसी’ (Emergency) सिनेमा संदर्भात एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कंगनाचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनाने तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर 25 जून 1975 सालातील एका वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी शेअर केली आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा कंगना सांभाळणार आहे. सिनेमामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. कंगनाने याआधीदेखील माजी मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललितांच्या भूमिकेत दिसून आली आहे.

कंगनाचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. कंगनाचा धाकड सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यातदेखील कमी पडला.