Dhaakad: कंगनाचा ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप; आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटांची विक्री

WhatsApp Group

Dhaakad: बॉलिवूड क्वीन कंगणाचे प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक फार आतूरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकवेळी कंगणाचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतो. मात्र नुकताच आलेल्या कंगणाचा चित्रपट धाकड याला अपवाद ठरला आहे. कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

चित्रपटाच्या आठव्या दिवशी तर धाकड देशभरात फक्त २० तिकिटच विकू शकले त्यामुळे त्या दिवशीची धाकडची बॉक्स ऑफीस कमाई फक्त ४४२० रुपयेच झाली.

धाकड पहिल्या दिवसापासूनच फार काही कमी कमाई करू शकला. कंगनाच्या या धाकड चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २ चित्रपटाने तगडी टक्कर दिली आहे. त्यामुळे धाकड पुर्णपणे फ्लॉप झाल्याचे चित्र आहे.

‘धाकड’ हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे. या सिनेमात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमामध्ये कंगनाने ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारली आहे.