Kane Williamson Century: केन विल्यमसनने विराटला टाकले मागे!

0
WhatsApp Group

विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात माउंट मौनगानुई येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात केन विल्यमसनने दुखापतीनंतर पुनरागमन करत आपले 30 वे कसोटी शतक झळकावले आणि विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. कोहली आणि ब्रॅडमन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 29शतके आहेत. आता विल्यमसनने 3- शतके झळकावून जो रूट, मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांची बरोबरी केली आहे. याशिवाय युवा रचिन रवींद्रने पहिले कसोटी शतक झळकावले.

कसोटी क्रिकेटमध्ये 32 कसोटी शतकांसह स्मिथ अजूनही या यादीत आघाडीवर आहे. रुट आणि विल्यमसन यांच्या नावे प्रत्येकी 30 आणि विराट कोहलीची 29 शतके आहेत. विल्यमसनचे गेल्या 9 कसोटी डावांतील त्याचे हे पाचवे शतक आहे. तो जगातील सध्याचा नंबर 1 कसोटी फलंदाज देखील आहे.

कसोटीत सर्वाधिक शतके 

  • स्टीव्ह स्मिथ- 32 शतके (107 सामने)
  • केन विल्यमसन- 30 शतके (97 सामने*)
  • जो रूट- 30 शतके (137 सामने*)
  • विराट कोहली- 29 शतके (113 सामने)
  • चेतेश्वर पुजारा – 19 शतके (103 सामने)
  • दिमुथ करुणारत्ने- 16 शतके (89 सामने*)
  • अँजेलो मॅथ्यूज- 16 शतके (107 सामने*)

न्यूझीलंडला रचिन रवींद्र नावाचा युवा खेळाडू लाभला आहे. चौथ्या कसोटीच्या सातव्या डावात त्याने पहिले कसोटी शतक झळकावले. यापूर्वी त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर रचिनने कसोटी क्रिकेटमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर तीन शतके आहेत.