छोट्या गावातून उद्योगाला सुरुवात करून ‘अंबिका मसाला’ ब्रँड जगासमोर नेणाऱ्या उद्योजक कमल परदेशी यांचे निधन झालंय. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अनेक महिलांसाठी छोटे-मोठे उद्योग उभारणाऱ्या उद्योजकाच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासhttps://t.co/bU4wzkmc7r #ambikamasala #kamalpardeshi
— ABP माझा (@abpmajhatv) January 2, 2024