मुंबई – कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यातून बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटीही सुटू शकलेले नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री काजोलही कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे, ज्याची माहिती तिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे Kajol tests positive for Covid-19 .
View this post on Instagram
अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासाचा फोटो शेअर करताना आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. काजोलने लिहिले की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. रुडॉल्फ सारखे माझे नाक कोणी पाहू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून जगातील सर्वात सुंदर हास्य पाहूया. पोस्टमध्ये काजोलने सांगितले की, ती तिची मुलगी न्यासाला खूप मिस करत आहे.
यापूर्वी काजोलसह अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, एकता कपूर, नकुल मेहता, नोरा फतेही, करीना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.