हिंदू धर्मात मृत्यु नंतर कोणी पुण्यवान माणूस 3 ठिकाणी जाऊ शकतो. चला तप मग आज जाणून घेऊया स्वर्गवासी, कैलासवासी आणि वैकुंठवासी यामधील फरक
१. स्वर्गवासी [जिथे बाकी देव राहतात, इंद्राचे (इंद्र म्हणजे कोणी व्यक्ती नाही तर एक पदवी आहे, देवांच्या राजाला इंद्र म्हणतात) राज्य असते] – स्वर्गात भरपूर समृद्धी असते, ज्यांना आपला पंथ माहीत नाही किंवा दाखवायचा नाही असे लोक मृत्यु नंतर नावापुढे स्वर्गवासी (स्व.) लावतात.
२. कैलासवासी (जिथे महाकाळ शिव शंभू राहतात). – कैलास पर्वतावर समृद्धी नाही पण सुख असते, शिव शंकराच्या पावन भूमी चे सुख! जे शैव पंथी असतात (उदा. लिंगायत) किंवा शंकराचे निस्सीम भक्त असतात (उदा. उत्तरेकडील ब्राम्हण) ते मृत्यु नंतर नावापुढे कैलासवासी (कै.) लावतात.
३. वैकुंठवासी (जिथे लक्ष्मी समवेत श्री विष्णू राहतात). -वैकुंठ म्हणजे श्री विष्णू चे घर. तिथे समृद्धी आणि सुख दोन्ही आहे. जे वैष्णव पंथी आहेत (उदा. वारकरी) ते मृत्यु नंतर नावा पुढे वैकुंठवासी (वै.) लावतात.