इंग्लंडविरुद्ध कगिसो रबाडाने घेतली हॅट्ट्रिक!

WhatsApp Group

शारजाहा- टी-20 विश्वचषक 2021 मध्ये शनिवारी खेळण्यात आलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात कगिसो रबाडाने दमदार कामगिरी केली. कगिसो रबाडाने तीन चेंडूत इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी धाडत हॅट्ट्रिक साजरी केली आहे.

रबाडाने 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्सला, दुसऱ्या चेंडूवर इऑन मॉर्गनला आणि तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन माघारी धाडत ही हॅट्ट्रिक साजरी केली. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही चौथीच हॅट्ट्रिक आहे. यापूर्वी 2007 च्या टी-20 विश्वचषकात ब्रेट लीने हॅट्ट्रिक घेतली होती. तर 2021 च्या टी-20 विश्वचषकात तब्बल 3 विक्रमी हॅट्ट्रिक चाहत्यांना पाहायला मिळाल्या .

रबाडाने घेतलेली ही हॅटट्रीक टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील तिसरी हॅटट्रीक ठरली आहे. 

कर्टिस कॅम्फर – (4-0-26-4) विरुद्ध नेदरलँड्स

वानिंदू हसरंगा –  (4-0-20-3) विरुद्ध दक्षिण आफ्रिका

कागिसो रबाडा – (4-0-48-3)  विरुद्ध इंग्लंड

 

रबाडाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 10 धावांनी विजय मिळवला, मात्र ‘नेट रन रेट’ कमी असल्याने 8 गुण मिळवूनही टी-20 विश्वचषकाचे उपांत्य फेरीचे तिकीट त्यांना मिळाले नाही.

सुपर 12 फेरीत ‘गट 1’ मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खात्यात 4 विजयांसह प्रत्येकी 8 गुण जमा आहेत. ‘गट 1’ मध्ये इंग्लंड +2.464 च्या ‘नेट रन रेट’च्या जोरावर पहिल्या तर ऑस्ट्रेलिया +1.216 ‘नेट रन रेट’सह दुसऱ्या स्थानी राहिल्याने समान गुण असूनही दक्षिण आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ‘नेट रन रेट’+0.739 एवढा राहिला.