पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात रत्नागिरी जिल्हा विरुद्ध धुळे जिल्हा या लढतीने झाली. धुळे संघाने 3-0 अशी सुरुवात केली होती मात्र रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप व अभिषेक शिंदे यांनी पलटवार करत धुळे संघावर लोन पडला. मध्यंतरा पर्यत धुळेच्या अक्षय पाटील ने सलग चढायांमध्ये गुण मिळवत सामन्यात रंगत आणली.
रत्नागिरी जिल्हा कडे मध्यंतराला 20-18 अशी आघाडी होती. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच अभिषेक शिंदे ने गुण मिळवत धुळे संघाला दुसऱ्यांदा ऑल आऊट केले. अभिषेक शिंदेला श्रेयस शिंदे ने चांगली साथ दिली. धुळे संघाकडून अक्षय पाटील ने सलग दुसरा सुपर टेन पूर्ण केला. तर रोहित पाटील ने बचवाफळी सांभाळत हाय फाय पूर्ण केला.
रत्नागिरी संघाने उत्तरार्धात उत्कृष्ट खेळ सुरू ठेवत सामन्यावर पकड मजबूत केली होती. रत्नागिरी संघाने 47-32 असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. अभिषेक शिंदे ने चढाईत 16 गुण तर श्रेयस शिंदे ने 12 गुण मिळवत विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर धुळे कडून पुन्हा एकदा अक्षय पाटील ने जोरदार खेळ केला मात्र आज तो आपल्या संघाला विजय मिळू देऊ शकला नाही.
बेस्ट रेडर- अभिषेक शिंदे , रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- रोहित पाटील, धुळे
कबड्डी का कमाल- श्रेयस शिंदे, रत्नागिरी