सूर्याकुमारपेक्षा संजू सॅमसन भारी! मग संजू भारतीय संघात का नाही? चाहते संतापले!

WhatsApp Group

मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असून 16 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पण त्यात केरळचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे नाव नाही. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून #JusticeForSanjuSamson हा ट्रेंड सुरू झाला आहे.


जेव्हा T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा संजू सॅमसननेही काही वेळातच एक फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रात संजू सॅमसन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये जबरदस्त झेल घेताना दिसत आहे.


संजू सॅमसन आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, परंतु प्रत्येक वेळी टीम इंडियाच्या निवडीत तो चुकतो. अशा परिस्थितीत या वेळीही त्याचे नाव यादीत नसल्यामुळे संजू सॅमसनचे चाहते संतापले.

27 वर्षीय संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत एक वनडे, दहा टी-20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास करिअरबद्दल बोलायचे झाले तर संजू सॅमसनने 55 मॅचमध्ये 3162 धावा केल्या आहेत. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनने दोन अर्धशतके झळकावली आहेत, तर 45 धावांची नाबाद खेळीही खेळली आहे.


विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एकूण 2 यष्टीरक्षक फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ पंत, इशान किशन यांचा समावेश आहे, अशा परिस्थितीत संजू सॅमसनला संघात स्थान मिळणं कठीणच होतं.