मुंबई : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटातील संघर्षाने राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं आहे. सर्वत्र या दोन गटातील संघर्षाची चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यातही शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत एकमेकांवर टीकेची झोड उठवली. या राजकीय गदारोळात व आरोप-प्रत्यारोपा दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिंदे आणि ठाकरे कुटूंबाच्या दिलजमाईची ही पत्रिका आहे. राज्याचे राजकीय वातावरण तापलं असताना शिंदे-ठाकरे कुटुंबियांच्या दिलजमाईच्या पत्रिकेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.
जुन्नर तालुक्यातील ही लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यात शिंदे आणि ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. जुन्नर तालुक्यामधील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या अनुराधा यांचा शुभविवाह 8 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे लग्न आणि ही लग्नपत्रिका प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
