Johnny Depp Vs Amber Heard: जॉनी डेपच्या बाजूने कोर्टाचा निकाल, EX-पत्नीला द्यावी लागणार अब्जावधींची भरपाई

WhatsApp Group

Johnny Depp Vs Amber Heard: ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ (Pirates of the Caribbean) या फिल्म सीरिजमुळे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जॉनीने त्याची एक्स वाईफ आणि अभिनेत्री अँबर हर्ड (Amber Heard) विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. व्हर्जिनियातील फेअरफॅक्स कोर्टामध्ये (Fairfax Court) या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आता या खटल्याचा निकाल समोर आला आहे. जॉनी डेपने हा खटला जिंकला असून या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सात न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला आहे.

अनेक दिवसांच्या वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यारोपानंतर आणि सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी अखेर डेपच्या बाजूने या खटल्याचा निकाल दिला आहे. एवढेच नव्हे तर आता डेपची एक्स वाईफ अँबरने डेपला 10 मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई आणि 5 मिलियन दंडात्मक रक्कम अर्थातच 1 अब्ज 16 कोटी रुपये देण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यांनतर या प्रकरणामध्ये डेपवरसुद्धा अँबरच्या मानहानीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने डेपला 2 मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई अँबरला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अँबर हर्डनं 2018 मध्ये वॉशिंग्टन पोस्टसाठी (The Washington Post) एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यामुळे आपलं करिअर उद्ध्वस्त (Career Ruined) झालं, असा दावा करत जॉनी डेपनं एंबर हर्डवर मानहानीचा खटला (Defamation Suit) दाखल केला आहे. या आर्टिकलमध्ये अँबरने कौंटुबिक हिंसाचाराबद्दल (Domestic Violence) लिहिलं होतं. पण, तिनं कुठेही थेट जॉनीचा उल्लेख केलेला नव्हता. पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या