
John Cena : WWE फॅन्साठी एक आनंदाची बातमी समोर आली असून तब्बल 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला प्रसिद्ध WWE स्टार जॉन सीना पुन्हा एकदा रिंगणात दिसणार आहे. तो 27 जून रोजी पुन्हा एकदा दोन हात करताना दिसेल. WWE ने याबाबतची घोषणा केली आहे. 27 जून रोजी होणाऱ्या रॉ (Raw) सामन्यात जॉन सीना WWE मध्ये पुनरागमन करेल.
27 जून 2002 रोजी जॉन सीनाने WWE मध्ये डेब्यू केले होते. अशामध्ये यंदा 27 जून रोजी त्याला WWE मध्ये 20 वर्षे पूर्ण होणार असल्यामुळे एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचदिवशी जॉन सीना WWE मध्ये पुनरागमन करणार असून त्याचा सामना थ्योरीशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.