Priyanka Chopra प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गूड न्यूज

WhatsApp Group

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांच्या चोप्राच्या Priyanka Chopra घरी पुन्हा एकदा गूड न्यूज आली आहे. प्रियंका चोप्राची मेहुणी सोफी टर्नरने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. सोफीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला. सोफी टर्नर आणि जो जोनास दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. सोफी टर्नरने दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिला आहे.

सोफी टर्नर बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर खूप गाजले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सोशल मीडियावरही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by S O P H I E T U R N E R (@sophiet)

सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी 2016 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. एका वर्षाच्या डेटिंगनंतर दोघांनी ऑक्टोबर 2017 मध्ये एंगेजमेंट केली. दोघांनी 2019 मध्ये लास वेगासमध्ये गुप्त पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनंतर, फ्रान्समध्ये, ते पुन्हा पूर्ण रितीरिवाजांनी लग्नाच्या बंधनात बांधले गेले. या दाम्पत्याला ‘विला’ ही दोन वर्षांची मुलगी आहे.