इंडियन एअर फोर्समध्ये 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
नवी दिल्ली – इंडियन एअर फोर्स (IFA) ने कुक, MTS (Multi-Tasking Staff), LDC (Lower Division Clerk), फायरमन आणि सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर इत्यादींच्या रिक्त पदांवर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागवले आहेत ( Job Opportunity in Indian Air Force ). इच्छुक आणि पात्र उमेदवार जाहिरात जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज पाठवू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह आणि आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदीमध्ये अर्ज विहित पत्त्यावर पाठवावा. लेखी परीक्षेच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ही भरती मुख्यालय सेंट्रल एअर कमांड, हेडक्वार्टर ईस्टर्न एअर कमांड, हेडक्वार्टर साउथ वेस्टर्न कमांड, हेडक्वार्टर ट्रेनिंग कमांड, हेडक्वार्टर मेंटेनन्स कमांड आणि हेडक्वार्टर वेस्टर्न एअर कमांड अंतर्गत गट ‘सी’ या पदांसाठी होणार आहे.
हेडक्वार्टर सेंट्रल एअर कमांडमध्ये, एलडीसीचं 1 पद आणि एमटीएसची 3 पदे रिक्त आहेत. मुख्यालय ईस्टर्न एअर कमांडमध्ये, CMTD (OG) ची 2 पदे आणि LDC ची 2 पदे रिक्त आहेत. मुख्यालय साउथ वेस्टर्न कमांडमध्ये कुकचे 1 पद रिक्त आहे.
लोअर डिव्हिजन लिपिक (LDC) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 वी पास असणे आवश्यक आहे आणि संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइपिंग स्पिड असणे आवश्यक आहे.
कुकच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 10वी पास, ट्रेडमधील 1 वर्षाच्या अनुभवासह कॅटरिंगमधील प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. सुतार पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतील ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारक असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी 18 ते 25 वर्षे
वयात सवलत – SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे आणि PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी 10 वर्षे.
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि (कौशल्य/शारीरिक/व्यावहारिक) परीक्षेतील उमेदवाराच्या कामगिरीनुसार.
अर्ज कसा करायचा – उमेदवार 30 ऑक्टोबर 2021 ते 29 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पत्त्याद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकतात. (सर्व पदांचे पत्ते वेगळे असल्यामुळे पत्त्यासाठी अधिसूचना पहा)
भारतीय हवाई दल गट ‘सी’ नागरी रिक्त पदांसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – ३० ऑक्टोबर २०२१.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०२१.
अधिक माहितीसाठी इंडियन एअर फोर्सच्या https://indianairforce.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.