बाबा रामदेव यांच्या मनात आणि डोळ्यात विकृती आहे… जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

WhatsApp Group

Jitendra Awhad on Baba Ramdev: महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे बाबा रामदेव वादात सापडले आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, माझ्या दृष्टीने ‘महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात आणि काही नाही घातलं तरीही छान दिसतात. रामदेव बाबा यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान आता  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबा रामदेव यांच्या विधानावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी बाबा रामदेव यांच्या विधानावर टीका केली, “रामदेव बाबांना आई आहे … आणि ते ब्रम्हचारी .. मग … मनात डोळ्यात विकृती … मराठी साहित्यात परस्त्री माते समान…”असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा  ?

रामदेव बाबा म्हणाले, जर तुम्हाला साडी नेसता येत नसेल तर काही हरकत नाही… आता घरी जा आणि साडी घाला. रामदेव पुढे म्हणाले की, स्त्रिया साडीत छान दिसतात, अमृता फडणवीस सारख्या स्त्रिया ड्रेस (सलवार सूट) मध्येही छान दिसतात.. आणि माझ्या मते काही नाही घातलं तरीही महिला छान दिसते.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update