
फेसबुक आणि इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडीओ अॅप्सच्या Short Video Apps जगात तगडी स्पर्धा मिळणार आहे. Meta च्या Reel फीचरला टक्कर देण्यासाठी Jio एक नवीन अॅप सादर करण्याचा विचार करत आहे. Jio कंपनी एक भारतीय आधारित शॉर्ट व्हिडिओ अॅप प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी अॅप फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्सप्रमाणेच काम करेल. आता सोशल मीडिया वापरकर्त्यांना एक नवीन पर्याय मिळेल, जिथे त्यांना चांगली कमाई करण्याची संधी देखील मिळेल.
रिलायन्स जिओ दुसऱ्या कंपनीसोबत मिळून शॉर्ट व्हिडिओ अॅप बनवणार आहे. रोलिंग स्टोन्स इंडियाच्या प्रेस रिलीझनुसार, क्रिएटिव्हलँड एशिया आणि जिओ प्लॅटफॉर्मने प्लॅटफॉर्म अॅप बनवण्यासाठी भागीदारी केली आहे. मनोरंजनासाठी हे अॅप सादर करण्यात येणार आहे. स्टार एंटरटेनर्सना चांगली कमाई प्रणाली प्रदान करणे हे आगामी अॅपचे उद्दिष्ट आहे.
Jio चे प्लॅटफॉर्म अॅप हे निर्माते, गायक, अभिनेते, संगीतकार, नर्तक, विनोदी कलाकार, फॅशन डिझायनर आणि सांस्कृतिक प्रभावक बनू इच्छिणाऱ्या इतर सर्व वापरकर्त्यांसाठी आहे. अशाप्रकारे विविध क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.