Jioकडून दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच, किंमत जाणून घ्या

WhatsApp Group

जिओने नुकतेच दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाशिवाय तुम्हाला कॉलिंग, एसएमएस आणि इतर फायदे देखील मिळतात. जिओचे हे रिचार्ज प्लॅन 30 ते 90 दिवसांसाठी येतात. जर तुमचा इंटरनेट वापर जास्त असेल तर तुम्ही या योजना निवडू शकता.

Jio ने Rs 899 आणि Rs 349 चे प्लान लॉन्च केले आहेत. अलीकडेच Jio ने नवीन वर्षाच्या निमित्ताने 2023 रुपयांची Jio न्यू इयर ऑफर Jio New Year Offer लाँच केली. चला जाणून घेऊया Jio च्या या प्लानबद्दल.

899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये युजरला 2.5GB प्रति डेटा मिळतो. यामध्ये युजरला 90 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना 90 दिवसांसाठी 225GB डेटा प्लॅन मिळतो. यामध्ये यूजरला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय ग्राहकाला जिओ अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळते. या रिचार्ज प्लॅनचे वापरकर्ते 5G डेटासाठी पात्र आहेत.

349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लानमध्ये युजरला एकूण 75GB डेटा मिळतो. यामध्ये यूजरला 30 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळतो.