T20 World Cup: विश्वविक्रम मोडल्याबद्दल जयवर्धनेने केले कोहलीचे अभिनंदन केले, म्हणाला…

WhatsApp Group

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार फटकेबाजी केली. T20 विश्वचषक 2022 मध्ये सलग दोन अर्धशतके झळकावल्यानंतर कोहली आफ्रिकेविरुद्ध स्वस्तात बाद झाला, पण बांगलादेशविरुद्ध नाबाद 64 धावा केल्याने कोहली पुन्हा चर्चेत आला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात त्याच्या दमदार खेळीच्या बळावर विराट कोहली T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने महेला जयवर्धनेचा विक्रम मोडला आहे. यानंतर श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. त्याने विराट कोहलीचे वर्णन योद्धा असे केले आहे.

कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात T20 विश्वचषकात महेला जयवर्धनेच्या सर्वाधिक धावांचा (1016) विक्रम मागे टाकला. विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेला जयवर्धने भारताच्या स्टार फलंदाजाचे नवीन विक्रम रचल्याबद्दल अभिनंदन करत आहे. आयसीसीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने म्हणाला, “विक्रम मोडण्यासाठी बनवले जातात. कोणीतरी माझा विक्रम मोडणार होता आणि तो तू विराट आहेस. अभिनंदन मित्रा. तू नेहमीच एक योद्धा होतास. असं जयवर्धने म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विराट कोहलीच्या नावावर T20 वर्ल्ड कपमध्ये 1065 पेक्षा जास्त धावा आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 921 धावा आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हे विराट कोहली पहिल्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेने 31 सामन्यांत 39.07 च्या सरासरीने 1,016 धावा केल्या आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. कोहलीसाठी अॅडलेड ओव्हल मैदान त्याच्यासाठी नेहमीच भाग्यवान ठरले आहे. या मैदानावर त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आणि दोन वर्षांनंतर कर्णधार म्हणून कसोटी पदार्पण करताना दोन्ही डावात शतके झळकावली आहेत.