प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी रामपूर येथील एमपी एमएलए कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जयाप्रदा यांनी दाखल केलेली रिकॉल याचिका स्वीकारण्यात आली आहे. एक दोन नाहीतर, सात वेळा वॉरंट बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहण्याचं कारण जया प्रदा यांनी सांगितलं आहे. एवढंच नाहीतर, त्यांनी तुरुंगात असलेल्या आझम खान यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि पक्त जया प्रदा यांची चर्चा रंगली आहे.
कोर्टातून बाहेर आल्यानंतर जया प्रदा म्हणाल्या, ‘मला कोर्टाचे आभार मानायचे आहेत. कोर्टाने मला दिलासा दिला आहे. मी दोनदा रामपूरमधून खासदार राहीली आहे. तुम्ही सर्वांनी मला खासदार होण्याचा दर्जा दिला. जनतेने मला खूप प्रेम दिलं. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त बोलू शकणार नाही.’
पुढे जया प्रदा म्हणाल्या, ‘राजनीती नाही तर, मी लोकांच्या मनात आहे. जनता माझ्या सोबत आहे. जे काही झालं, ते फक्त आणि फक्त माझ्या प्रकृतीमुळे झालं आहे. माझा बीपी हाय झाला होता. शुगर लेवल देखील नियंत्रणात नव्हती. माझ्या कमरेत देखील त्रास होता. किडनी इंफेक्शन होण्याचा धोका होता. त्यामुळे मी डॉक्टरांसोबत फिरत होती. आता देखील माझी प्रकृती ठिक नाही.’