…तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटत नाही – जयंत पाटील

WhatsApp Group

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुका भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विधासभेच्या 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, कारण तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटतं नाही. शिंदे गटाचे अस्तित्व राहणारच नाही असा दावा त्यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, “भाजप आणि एमव्हीए यांच्यात लढत असताना शिंदे गट टिकेल असे मला वाटत नाही.” शिंदे यांनी गेल्या वर्षी अविभाजित शिवसेनेशी फारकत घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एमव्हीए सरकार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. अलीकडेच निवडणूक आयोगाने त्यांच्या गटालाच खरी ‘शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिले.

‘भाजपला छोट्या पक्षांना अस्थिर करायचे आहे’
भाजपला स्थानिक राजकीय संघटनांचे अस्तित्व नको असून त्यांच्या विकासाच्या विरोधात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, ‘भाजपने छोटे पक्ष-मित्र किंवा प्रतिस्पर्धी नष्ट करण्याचे काम केले आहे. भाजपचा एकमेव अजेंडा म्हणजे लहान पक्षांना अस्थिर करणे, जेणेकरून ते त्यांचे मताधिक्य मिळवू शकतील. तोपर्यंत शिंदे गट कायम राहिल्यास भाजपला 48 जागा लढवायला द्या आणि तुमचे पाच-सहाच उमेदवार जिंकू शकतील, असे ते म्हणाले.