Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, पाकिस्तानी दिग्गज इम्रान खानला मागे टाकले

WhatsApp Group

Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. केपटाऊनमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर आफ्रिकेत कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारतीय संघाला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला जसप्रीत बुमराह. या मालिकेदरम्यान त्याने पाकिस्तानी दिग्गज इम्रान खानचा विक्रमही मोडला.

जसप्रीत बुमराहने इतिहास रचला

जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 12 बळी घेतले. यासह जसप्रीत बुमराहच्या इतर (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 113 विकेट पूर्ण झाल्या आहेत. इतर देशांमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा आशियाई गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानला मागे टाकले आहे. इम्रान खानने सेना देशांमध्ये एकूण 109 विकेट घेतल्या होत्या.

इतर देशांमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारे आशियाई गोलंदाज

  • 146 विकेट – वसीम अक्रम
  • 141 विकेट – अनिल कुंबळे
  • 130 विकेट – इशांत शर्मा
  • 123 विकेट – मोहम्मद शमी
  • 120 विकेट – मुथय्या मुरलीधरन
  • 119 विकेट – झहीर खान
  • 117 विकेट – कपिल देव
  • 113 विकेट – वकार युनूस
  • 113 विकेट – जसप्रीत बुमराह*
  • 109 विकेट – इम्रान खान

जसप्रीत बुमराहसाठी केपटाऊनचे न्यूलँड्स मैदान खूप खास आहे. या मैदानावर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळला. आता तो या मैदानावर भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. बुमराहने या मैदानावर 3 सामने खेळताना 18 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज जवागल श्रीनाथ होता. त्याने 2 सामन्यात सर्वाधिक 12 विकेट घेतल्या होत्या.