इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने घातक गोलंदाजी केली. त्याने आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या शानदार गोलंदाजीसमोर आरसीबीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. आयपीएलमध्ये दोनदा 5 बळी घेणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे.
बुमराहने 4 षटके टाकली आणि 21 धावांत 5 बळी घेतले. आयपीएल 2024 मधील ही पहिली 5 विकेट आहे. त्याने विराट कोहली (3), फाफ डू प्लेसिस (61), महिपाल लोमरोर (0) आणि सौरभ चौहान (9) यांना आपले बळी बनवले.
𝐉𝐀𝐒𝐏𝐑𝐈𝐓 𝐁𝐔𝐌𝐑𝐀𝐇, 𝐘𝐎𝐔 𝐋𝐄𝐆𝐄𝐍𝐃!
A 5-fer in #MIvRCB 🔥🫡#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/G9TlKtLl2o
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दोनदा 5 विकेट घेतल्या आहेत
बुमराह व्यतिरिक्त जेम्स फॉकनर, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी आयपीएलच्या इतिहासात दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. दोनदा अशी कामगिरी करणारा बुमराह हा पहिला मुंबईचा गोलंदाज आहे. या सामन्यापूर्वी बुमराहने आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध 10 धावांत 5 बळी घेतले होते. बुमराह आरसीबीविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला आहे.
Jasprit Bumrah has his second IPL five-for 🔥#MIvRCB #IPL2024 pic.twitter.com/BrVAbofE5l
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 11, 2024