
Jasprit Bumrah ruled out : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपशीलवार मूल्यांकन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे.पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीला बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतून बाहेर पडला होता. बीसीसीआय लवकरच या T20 विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संघात आणखी एका गोलंदाजाचा समावेश करणार आहे.
बुमराहच्या बाहेर पडण्याच्या वृत्ताला दुजोरा देताना बीसीसीआयने म्हटले आहे की, बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला T20 विश्वचषकातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञांसोबत अनेक तपशीलवार मूल्यांकन आणि चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी बूमराह पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालू असलेल्या T20 मालिकेतून तो बाहेर पडला होता. 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडणारा बुमराह हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
NEWS – Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
More details here – https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 3, 2022
यापूर्वी, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुमराहच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली होती. जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर नाही. विश्वचषक सुरू व्हायला अजून वेळ आहे. आपण थांबले पाहिजे आणि घाईत काहीही बोलू नये. असं ते म्हणाले होते.
बुमराहच्या जागी कोणाला मिळणार संधी?
जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात अनेक नावांची चर्चा आहे. विश्वचषक स्पर्धेतील राखीव संघातील मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजच्या नावावर अनेक मतप्रवाह सुरू आहेत. काही क्रिकेट दिग्गजांनी उमरान मलिकचे नावही पुढे केले. आता बुमराहची जागा कोण घेणार हे पाहावे लागणार.