Jasprit Bumrahने मोडला नेहराचा जुना विक्रम, 6 विकेट घेत केला हा पराक्रम

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आणि मोहम्मद शमीच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. टीम इंडियाला विजयासाठी 111 धावांची गरज होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अवघ्या 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता 114 धावा केल्या आणि सामना जिंकला.

या सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 6 विकेट घेतल्या. यादरम्यान बुमराहने आशिष नेहराचा खास विक्रम मोडला आहे. या सामन्यात प्रथमच भारतीय वेगवान गोलंदाजांनी वनडे सामन्यात सर्व 10 विकेट घेतल्या. लंडनच्या ओव्हलमध्ये बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने जेसन रॉयला शून्यावर बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर बुमराहनेही जो रूटला शून्यावर बाद केले. त्याचवेळी जॉनी बेअरस्टो 7 धावांवर बाद झाला. त्याने लिव्हिंगस्टोन, डेव्हिड विली आणि कार्सी यांनाही बाद केले. अशाप्रकारे बुमराहने 7.2 षटकात 19 धावा देत 6 बळी घेतले. ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

भारतासाठी एकदिवसीय सामन्यांच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. त्याने एका सामन्यात केवळ 4 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. तर अनिल कुंबळे या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 12 धावांत 6 बळी घेतले. आता बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 19 धावांत 6 विकेट्स घेतल्या. नेहराने 23 धावांत 6 बळी घेतले.

एकदिवसीय मधील भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी –

6/4 – स्टुअर्ट बिन्नी
6/12 – अनिल कुंबळे
6/19 – जसप्रीत बुमराह*
6/23 – आशिष नेहरा