IPL सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का, ‘या’ स्फोटक फलंदाजाने घेतली माघार

WhatsApp Group

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने इंडियन प्रीमियर लीगच्या IPL १५व्या हंगामातून माघार घेतली आहे. जेसन रॉयला गुजरात टायटन्सने २ कोटींना विकत घेतले. जेसनने गुजरात टायटन्सला आयपीएलमध्ये सहभागी न होण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेसन रॉयने काही दिवसांपूर्वी गुजरात टीम मॅनेजमेंटला याबाबत माहिती दिली होती.

नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) जेसन रॉय क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रॉय दीर्घकाळ बायो-बबलमध्ये राहून थकवा टाळण्यासाठी त्याने लीगमधून आपले नाव काढून घेतले आहे. २०२० मध्येही जेसन रॉय या लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जेसन रॉय रोला १.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय यापूर्वी गुजरात लायन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला आहे. या लीगमध्ये त्याने आतापर्यंत केवळ १३ सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याच्या नावावर ३२९ धावा आहेत. गुजरात लायन्सकडून खेळताना रॉयने २०१७ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून लीगमध्ये पदार्पण केले. जेसन रॉय ऑक्टोबरमध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.


जेसन रॉयची PSL मधील कामगिरी : पाकिस्तान सुपर लीगमध्येही जेसन रॉयने जबरदस्त खेळ दाखवला आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना रॉयने ६ सामन्यात ३०३ धावा केल्या. त्याने ६ पैकी १ डावात एक शतक आणि २ अर्धशतक ठोकले. पहिल्या सामन्यात जेसन रॉयने लाहोर कलंदरविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. जेसन रॉयचे संघाबाहेर पडणे हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.