जापानी मुलगा हिंदीत बोलला! PM मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर सम्मेलनासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जबरदस्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये जपानच्या मुलांनीही पंतप्रधान मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत केले. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

टोकियोमध्ये पोहोचल्यानंतर, अनेक मुले पीएम मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते. ही मुले हातात पेंटिंग घेऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत करत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी या मुलांच्या पेंटिंग्सवर ऑटोग्राफही दिले. यावेळी या मुलांनी पंतप्रधान मोदींसोबत हिंदी भाषेत संवाद साधला. यावर मोदी म्हणाले, ‘व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? फार छान समजतं.’

टोकियोमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना तेथील भारतीय नागरिकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’, अशा घोषणा दिल्या. याच वेळी मोदींना ‘भारत मां का शेर’ असेही संबोधण्यात आले. लोक त्यांच्या स्वागतासाठी हातात पोस्टर्स घेऊन उभे होते.