धक्कादायक, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही दिग्गजांची जोडी इंग्लंडच्या संघातून बाहेर!

WhatsApp Group

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे England Test squad. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिका खेळलेले इंग्लिश संघात आठ बदल करण्यात आले आहेत.

जेम्स अँडरसन James Anderson आणि स्टुअर्ट ब्रॉड Stuart Broad या अनुभवी वेगवान गोलंदाजांना इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय डेव्हिड मलान, जोस बटलर आणि सॅम बिलिंग्स या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.

हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी

इंग्लंड क्रिकेटचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक अँड्र्यू स्ट्रॉस, अंतरिम मुख्य प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड आणि जेम्स टेलर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली.


डरहमचा सलामीवीर अ‍ॅलेक्स लीज आणि यॉर्कशायरचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशर यांचा प्रथमच इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ

जो रूट (कर्णधार ), जॉनी बेअरस्टो, जॅक क्रॉली, मॅथ्यू फिशर, बेन फोकस, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, अ‍ॅलेक्स लीस, साकिब महमूद, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किन्सन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत