
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 650 बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. सोमवारी ट्रेंट ब्रिज येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान टॉम लॅथमला बाद करून अँडरसनने ही कामगिरी केली. अँडरसनने आपल्या 171व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली.
Bowled him! Latham departs in the first over, and James Anderson reaches 650 Test wickets! 🐐 #ENGvNZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 13, 2022
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अँडरसन सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरन (800बळी) आणि शेन वॉर्न (708बळी) यांनी अँडरसनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आगामी काळात अँडरसनची नजर दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला मागे टाकण्यावर असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी – 800 विकेट्स
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी – 708 विकेट
- जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2022): 171* कसोटी – 650* विकेट
- अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी – 619 विकेट